Mahayuti Protest Mumbai : वरळीतल्या भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करण पडलं महागात

मुंबईत झालेल्या भाजपच्या मोर्चात नियमांच उल्लंघन झाल्या प्रकरणी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahayuti Protest Mumbai : वरळीतल्या भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करण पडलं महागात

मंगळवारी झालेल्या वरळीतल्या मोर्चात नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार. मुंबईत झालेल्या भाजपच्या मोर्चात नियमांच उल्लंघन झाल्या प्रकरणी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर भाजपने मंगळवारी वरळीतील रस्त्यावर जनआक्रोश मोर्चा केला होता. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया म्हणून 21 एप्रिलला मुंबईत जांबोरी मैदान ते वरळी डोम मार्ग असा भव्य जनआक्रोश मोर्चा कारढण्यात आला. मात्र यावेळी वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. 

हेही वाचा- Devendra Fadnavis criticized Mallikarjun Kharge : "खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला" खरगेंचं पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान, फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती पण नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे मत आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरळी पोलीस करणार कायदेशीर कारवाई करून मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल करणार आहेत. सध्या मुंबई पोलिसांच्या वतीने या मोर्चात कोणकोणत्या नियमांच उल्लंघन करण्यात आलं आहे याचा सीसीटीवी सुद्धा तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा मोर्चाचे आयोजक संतोष पांडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कालच्या भाजपच्या मोर्चादरम्यान झालेल्या नियमांच्या उल्लंघनावर मुंबई महापौर रितू तावडे यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रितू तावडे म्हणाल्या की, "कालचा मोर्चा होता तो नियोजित होता त्याच्या परवानगी मिळाली होती. त्यात एका भगिनीला त्रास झाला… मी स्वतः ते पाहील… जर कोणाला त्रास झाला असेल तर मुंबईच्या महापौर म्हणून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते. पण एवढं ऊन असताना महाराष्ट्रातील महिला तिथे उभ्या होत्या.  विरोधकांनी नारी शक्ती विधेयकाला विरोध केला त्याला आम्ही विरोध केला. सगळी यंत्रणा तिथे होती पोलीस प्रशासन होत त्या महिलेला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वर्षा गायकवाड यांच्याकडून काय अपेक्षा करणार… ज्या महिलांनी विरोध केला त्या महिलांची पार्श्वभूमी तपासून पाहा… आतापर्यंत काँग्रेस आणि इतर पक्षांने आंदोलन किती केली ते बघा…"

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number