देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहेत. अशातच ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे. देशात ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णांतही वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी देशात बूस्टर डोस देण्यास सुरूवात होणार आहे. येत्या १० जानेवारीपासून देशात बूस्टर डोस देण्यात येणार आहेत.
देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात होणार आहे. तसेच ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. तसेच यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
१० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
६० वर्ष आणि त्यावरील नागरिकांना लसीचे डोस देण्यात येण्यात येणार आहे.
दुसऱ्या डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र.
ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार आहे.
६० वर्ष आणि त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देताना प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
मात्र अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.
शासकीय केंद्रावर सर्व नागरिकांचं लसीकरण विनामूल्य होणार.
खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्राने घोषित केलेल्या किंमतीत घ्यावी लागेल.