मुंबई, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट करण्यात येण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.