Bollywood Singer Marriage : प्रसिद्ध गायकाने गुपचुप उरकलं लग्न,बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

त्यामुळेच त्याने आपल्या लग्नाची बातमी गुप्त ठेवली.

Bollywood Singer Marriage : प्रसिद्ध गायकाने गुपचुप उरकलं लग्न,बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

बॉलिवूड पार्श्वगायक जुबिन नौटियाल यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित गावात गुपचूप लग्न केले आहे. त्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत संसार थाटला आहे. 

जुबिन नौटियालचा आवाज  हा लोकांना मंत्रमुग्ध करतो. मात्र तो आपले खासगी आयुष्य गुप्त ठेवतो.  त्यामुळेच त्याने आपल्या लग्नाची बातमी गुप्त ठेवली. बॉम्बे टाइम्समधील एका वृत्तानुसार, जुबिनने उत्तराखंडमधील आपल्या मूळ गावी बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले. हा सोहळा अगदी खाजगी स्वरूपाचा होता.

समोर आलेल्या माहितीनुसार,  गायकाच्या लग्नात केवळ जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. जुबिनने डेस्टिनेशन वेडिंग किंवा भव्य विवाहसोहळ्याऐवजी एक साधा आणि पारंपरिक विवाहसोहळा निवडला. जुबिनच्या लग्नाच्या बातमीने त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number