पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच संध्याकाळी ५ वाजता टाळ्या वाजवून, घंटानाद करून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानले. अनेक कलाकारांनीही यात सहभागी होत त्यांनीही टाळ्या वाजवत, थाळ्या वाजवत आभार मानले. अनेकांनी Instagram वर हा प्रसंग पोस्ट केला आहे.