Meenakshi Shinde Viral Call : ‘दम असेल तर समोर येऊन बोला…’; कथित फोन कॉलमध्ये शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंची कार्यकर्त्याला शिवराळ भाषेत धमकी

संभाषणात निवडणुकीचा थेट उल्लेख करत त्या म्हणतात, फालतू कमेंट करतात हे लोक. काय असेल ते वन टू वन नयेवून समोर बोला ना...

Meenakshi Shinde Viral Call : ‘दम असेल तर समोर येऊन बोला…’; कथित फोन कॉलमध्ये शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंची कार्यकर्त्याला शिवराळ भाषेत धमकी

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, एका कथित फोन संभाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि एका स्थानिक कार्यकर्त्यामधील हा कॉल सध्या चर्चेचा विषय ठरला असून, या संभाषणात गंभीर आरोप, धमकीवजा भाषा आणि दबाव टाकण्याचे उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.

या कथित संभाषणात मीनाक्षी शिंदे म्हणतात, “फालतू मेसेज, बोगस अकाउंट ओपन करून यांच्यात दम नाही तर ह्या लोकांनी कशाला करायचं? आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात, तर काय राहील रे त्याची इज्जत?”
यावर समोरून तो व्यक्ती म्हणतो, “मला काही माहिती नाही. मी पाच दिवस आजारी होतो, अ‍ॅडमिट होतो. मी कामावरसुद्धा जात नाही.” यावर प्रत्युत्तर देताना मीनाक्षी शिंदे म्हणतात, “तूही येत नाहीस, बाकीचेही येत नाहीत. मग मला हेच म्हणायचं का, की यांच्या काय बायका पळवून नेल्या का माझ्या नवऱ्याने?”

संभाषणात पुढे कार्यकर्ता म्हणतो, “मीनाक्षीताई, मला खरंच बरं वाटत नाही, त्यामुळे मी आज बेलापूरला आलोय.” त्यावर मीनाक्षी शिंदे म्हणतात, “ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी उद्यापासून असं चालू करेल. बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. कॉलवर समोरून तो व्यक्ती म्हणतो काय असेल ते बोलून घेतो मी, मीना अंटी”

हेही वाचा: Pakistan Economic Loss: शहाणपणा नडला; भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानचा अफगाणिस्ताननेच केला ‘करेक्ट कार्यक्रम, काय घडलं नेमकं?

या कॉलमध्ये आनंद भोईर यांचा उल्लेख करत मीनाक्षी शिंदे म्हणतात, “तो जो आनंद भोईर आहे, तो दुसऱ्यांच्या घरात जातो. रस्त्यावर लोक त्याला मारतात, सगळ्यांनी त्याची लायकी काढलेली आहे. आता त्याला दुसऱ्यांचा पुळका आलाय. दुसऱ्यांच्या बायकांना तो छळतोय. त्याची वाट लावायला मला वेळ लागणार नाही. त्यांची कशी वाजवायची, ती मी वाजवणार. असं काय केलं त्या लोकांनी, की त्यांच्या बायका जणू काही पळून गेल्या?”

संभाषणात निवडणुकीचा थेट उल्लेख करत त्या म्हणतात, “फालतू कमेंट करतात हे लोक. काय असेल ते समोरा समोर येवून बोला ना. 16 तारखेला काय आहे ते मी दाखवेल. आणि त्याला सांग, तू किती जरी पळालास ना, माझी सीट काढायची ती मी काढेल. नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी. तुम्ही घरातसुद्धा बसणार नाही अशी वाट लावेल मी. शिवाजीनगरची जी घरं वाचली आहेत, ती माझ्यामुळे वाचली आहेत. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ लागणार नाही.”

या संभाषणाच्या शेवटच्या टप्प्यात मीनाक्षी शिंदे म्हणतात, “मी एखाद्याला घरात जर पाठवलं ना, तर मी काय करेल ते समजून घ्या. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला. पंधरा दिवसांत तुम्ही मानपाड्यात राहणार की भूषणच्या घरी जाऊन राहणार?” यावर कार्यकर्ता सांगतो, “माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही.” मात्र मीनाक्षी शिंदे त्याच्यावर आरोप करत म्हणतात, “तुला पांडे सांगतोय म्हणून तू प्रचाराला येत नाहीयस.” पुढे त्या म्हणतात, “निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी मी सीपींना फोन करून यांची वाट लावेल. घरात घुसून तोडफोड करायला मी सांगेल.” अखेरीस कार्यकर्ता, “मी बोलून जे काही असेल ते कळवतो,” असे म्हणत कॉल कट करतो.

या कथित फोन संभाषणामुळे बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापले असून, या प्रकरणात कायदेशीर पावले उचलली जाणार का आणि प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: NCP Candidate Amol Balwadkar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; पुण्यातील उमेदवाराचा कुख्यात गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number