BMC Election 2025 : मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये शिवसेनेला पसंती; भाजप सर्व्हेतून माहिती समोर

भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुंबईतील 18 वॉर्डांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत मुस्लिम बहुल मतदारसंख्या असून येथे भाजपला थेट विरोध जाणवत आहे.

BMC Election 2025 : मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये शिवसेनेला पसंती; भाजप सर्व्हेतून माहिती समोर

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू असताना, भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमधून एक महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे. येत्या निवडणुकीत मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये भाजपविरोधी भावना असूनही एकनाथ शिंदेंच्या नावाला चांगली पसंती मिळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारी वाटपाच्या चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दरम्यान झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर महायुती म्हणून महापालिका निवडणुका लढवण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले. मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकत्र लढण्याच्या पर्यायावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते समाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर महापालिकांसाठी स्थानिक समित्या स्थापन करून युतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने रचला जागतिक पातळीवरील इतिहास; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुंबईतील 18 वॉर्डांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत मुस्लिम बहुल मतदारसंख्या असून येथे भाजपला थेट विरोध जाणवत आहे. मात्र या विरोधातही एकनाथ शिंदेंच्या नावाला आश्चर्यकारक प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. शिंदे यांच्या "लाडकी बहिण" योजनेचा प्रभाव आणि मुस्लिम महिला मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती यामुळे शिंदेंच्या उमेदवारांना या भागात फायदा होऊ शकतो, असे सर्व्हेच्या निष्कर्षांमधून स्पष्ट होत आहे.

सर्व्हेनुसार 18 पैकी 18 वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव निर्णायक आहे. त्यापैकी 18 वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारसंख्या 50 टक्क्यांच्या वर असून या भागात शिंदे गटाला तुलनेने अधिक स्वीकारार्हता दिसून आली आहे. 7 वॉर्डांमध्ये 35 टक्के मुस्लिम मतदार असून येथेसुद्धा शिंदे यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या जागा शिंदे गटाला दिल्यास भाजपाकडून फारसा विरोध होण्याची शक्यता नाही, अशी माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली.

महानगरपालिका निवडणुकीच्या जवळ येणाऱ्या काळात महायुतीतील पक्षांमध्ये सीट शेअरिंग, उमेदवारी आणि मुस्लिम बहुल वॉर्डांची रणनीती या मुद्द्यांवर निर्णायक चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेचा मुस्लिम बहुल भागात किती फायदा होईल आणि भाजपाचा सर्व्हे प्रत्यक्ष परिणामांमध्ये कसा परावर्तित होईल, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला आणि पाण्यात पडला; पैठण तालुक्यातील घटना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number