एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेते नाराजीमुळं बंडखोरी केलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल असल्याची माहिती आहे. मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये होणाऱ्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर आहेत. राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितल्यामुळे प्रकाश सुर्वे इतर उमेदवारांसाठी नॉट रिचेबल झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वे यांची तक्रार केल्याने पक्षश्रेष्ठी प्रकाश सुर्वे यांच्यावर नाराज झाले आहेत. यामुळं प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.