मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा लढतींचीही चर्चा होताना दिसतेय.
मुंबईतल्या प्रभादेवी-दादर भागातील वॉर्ड क्रमांक 194 मधील लढतीकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या प्रभागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, निष्ठावंत शिलेदाराचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश
तर याच प्रभागात सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत.
हेही वाचा – Jalgaon: अर्ज भरला, पण एबी फॉर्म मिळालाच नाही! महापालिका निवडणुकीत निष्ठावंत महिला उमेदवाराचे अश्रू अनावर
समाधान सरवणकर यांची बहीण प्रिया सरवणकर गुरव यांना देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्या प्रभाग क्रमांक १९१ मधूनशिवसेना भाजपा रि.पा.ई. (अ)-रिपब्लिकन सेना महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळं तेजस्विनी आता नणंदेसाठीही प्रचार करताना दिसणार आहे.