Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपरोधिक कवितेतून जोरदार टीका केली आहे.

Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता

येत्या 15 जानेवारीला महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत असून, मुंबई महापालिकेच्या रणांगणात राजकीय धुराळा उडू लागला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र येत ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच, महायुतीचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले यांनी उपरोधिक कविता शेअर करत ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार प्रहार केला आहे. रामदास आठवले यांनी उपरोधिक कविता करताना लिहले आहे, 

हेही वाचा: Western Freight Corridor : देशातील मालवाहतुकीला मिळणार गती; जेएनपीटी-वैतरणा समर्पित कॉरिडॉरची सुरक्षा चाचणी यशस्वी

“राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी

नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत

आम्ही आठवड्याला 600-700 लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो
म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो

राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही
आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही?

ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं,

तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती!”

एकंदरीतच रामदास आठवले यांच्या या कवितात्मक हल्ल्यामुळे मुंबईच्या राजकारणात वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, मतदार कोणाच्या कामावर विश्वास ठेवतात हे निकालातून स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या कवितेने राजकीय चर्चांना नवा आयाम दिला असून, मुंबईतील सत्तासमीकरणांवर याचे पडसाद उमटताना दिसणार आहेत.

सध्या तरी या कवितेला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे थेट उत्तर देतील का, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते, ठाकरे स्टाइल म्हणजे योग्य वेळ साधून, थेट शब्दांत आणि मुद्देसूद पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची परंपरा आहे. त्यामुळे लगेच प्रतिक्रिया न देता, एखाद्या जाहीर सभा, मुलाखत किंवा राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर यावर भाष्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होणार असल्याने, आठवले यांच्या या कवितेवर ठाकरे बंधूंकडून उत्तर येते का, आणि ते कोणत्या शैलीत येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: IIT Student High Salary : गुगल-मायक्रोसॉफ्ट नाही, ‘या’ कंपनीने दिले अडीच कोटींचे पॅकेज; वाचा कोण आहे हा लकी विद्यार्थी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number