‘बीएमसीला काळजी पेंग्विनची’ – देवेंद्र फडणवीस

आज हिवाळी अधिवेशाचा दुसरा पार पडला. आजही विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. तर अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमुळे सभागृहात गदारोळ पाहण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेमध्ये बालक मृत्यूच्या प्रकरणाने वाद पेटला. यामुद्द्यावरून बोलताना फडणवीस म्हणाले, मुंबई पालिकेला पेंग्विनची काळजी जास्त आहे. […]

‘बीएमसीला काळजी पेंग्विनची’ – देवेंद्र फडणवीस

आज हिवाळी अधिवेशाचा दुसरा पार पडला. आजही विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. तर अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमुळे सभागृहात गदारोळ पाहण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

विधानसभेमध्ये बालक मृत्यूच्या प्रकरणाने वाद पेटला. यामुद्द्यावरून बोलताना फडणवीस म्हणाले, मुंबई पालिकेला पेंग्विनची काळजी जास्त आहे. मात्र बालकांची काळजी नाही, असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. तसेच याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच जे मी पाच वर्षे म्हणत होतो तेच खरे सिद्ध झाले असा टोलाही त्यांनी लगावला.

विधानसभेत महाविकास आघाडी सरकारने मुसलमानांना आरक्षण देण्याचे नाकारले असल्याची स्पष्टोक्ती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली. त्यामुळे मुसलमानांना आरक्षण शक्य नव्हते आणि नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणाचा वाद विधानसभेत पुन्हा गाजला असून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ आमने-सामने आले, त्यामुळे २०१० ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षण मिळवण्याबाबत झोपा काढल्या तर मविआने ओबीसी खटल्यात न्यायालयीन कारवाईत आळशीपणा केल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number