परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक

राज्यात अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र विलिनीकरण डोक्यातून काढून टाकण्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच कामावर पुन्हा रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने राग व्यक्त करत परिवहन मंत्री […]

परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक

राज्यात अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र विलिनीकरण डोक्यातून काढून टाकण्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच कामावर पुन्हा रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने राग व्यक्त करत परिवहन मंत्री अनिल परब यांचा निषेध केला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सोलापूर आगारत दौऱ्यावर असताना एसटी कर्मचाऱ्यांने परिवहन मंत्र्यांचा निषेध केला आहे. एसटी कर्मचाऱ्याने हाताचा बोट कापत परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक घातला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारला आहे. संप मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णयही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र तरीही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्यांचे हाल होत आहे. एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना पायपीट करत अंतर गाठावे लागत आहेत. तसेच इतर खाजगी वाहने प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारत असल्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number