मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू

सतना, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील ४७ आमदार मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. हे आमदार मध्य प्रदेशमधील पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी होणार आहेत. भाजपाच्या महाराष्ट्रातील आमदारांकडे तेलंगणा आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील निवडक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. ज्या आमदारांकडे तेलंगणाची […]

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू

सतना, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील ४७ आमदार मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. हे आमदार मध्य प्रदेशमधील पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी होणार आहेत.

भाजपाच्या महाराष्ट्रातील आमदारांकडे तेलंगणा आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील निवडक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. ज्या आमदारांकडे तेलंगणाची जबाबदारी आहे ते आमदार तेलंगणाचा दौरा करणार आहेत.

मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्रातील आमदार पुढील ७ दिवसांत मध्य प्रदेशमधील वेगवेगळ्या भागांना भेटी देतील. भाजपाच्या केंद्रीय समित्यांचे सदस्य दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील आमदारांना वेगवेगळ्या विषयांत मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर आमदार निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी होणार आहेत. दौऱ्यावर आमदारांच्या हालचालींवर वरिष्ठ नेतृत्व अॅपच्या मदतीने लक्ष ठेवणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये कोण कोणत्या जिल्ह्यात जाणार

जयकुमार रावल – नागोद विधानसभा – जिल्हा – सतना

मंगेश चव्हाण – कसरावद विधानसभा – जिल्हा – खरगोन

देवयानी फरांदे – देवास विधानसभा – जिल्हा – देवास

संजय कुटे – नेपानगर विधानसभा – जिल्हा – बुऱ्हाणपूर

रणधीर सावरकर – भैंसदेही विधानसभा – बैतुल

राम शिंदे – जुन्नारदेव विधानसभा – छिंदवाडा

रणजित सिह मोहिते पाटील – अमरवाडा विधानसभा जिल्हा छिंदवाडा

श्वेता महाले – जबलपूर पश्चिम विधानसभा – जबलपूर जिल्हा

नितेश राणे – बछीया विधानसभा – मंडला जिल्हा

प्रवीण दरेकर – जबलपूर केंट विधानसभा – जबलपूर जिल्हा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number