Maithili Thakur : आमदार म्हणून हा माझा पहिलाच कार्यकाळ…, मी माझ्या लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन…; निकालाआधीच मैथिलीचा व्हिडिओ व्हायरल

गायिका आणि भाजप उमेदवार मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहेत.

Maithili Thakur : आमदार म्हणून हा माझा पहिलाच कार्यकाळ…, मी माझ्या लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन…; निकालाआधीच मैथिलीचा व्हिडिओ व्हायरल

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सकाळपासून आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए गट आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपने उमेदवारी दिलेल्या गायिका मैथिली ठाकूर तिच्या अलीनगर मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे दिसूनू येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार मैथिली ही तब्बल ८ हजार मतांनी आघाडीवर आहे. अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत विजयाच्या जवळ असल्याने मैथिली खूपच आनंदी झाली आहे. तिने व्हिडिओच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच विजयाची अपेक्षाही केली आहे.

काय म्हणाली मैथिली ठाकूर, “हे स्वप्नासारखे आहे. लोकांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत… आमदार म्हणून हा माझा पहिलाच कार्यकाळ असेल आणि मी माझ्या मतदारसंघासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन… मी माझ्या लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन… मी सध्या फक्त अलीनगर आणि मी त्यांना कसे काम करू शकते ते पाहू शकते…”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number