Kripashankar Singh On BMC Election : "मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार" भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या

भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ माजली आहे. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर मुंबईकरांना राग अनावर असं वक्तव्य केलं आहे.

Kripashankar Singh On BMC Election : &quotमुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार&quot भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या

सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत अनेकठिकाणी यावरुन गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीपुर्वीच मराठी अमराठी आणि भाषिकवाद पेटल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा- BMC Election 2026 : मोठी राजकीय घडामोड! महानगरपालिका रणधुमाळीत स्वाभिमानी पक्षाची महाविकास आघाडीला साथ
अशातच आता भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ माजली आहे. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर मुंबईकरांना राग अनावर असं वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, "बिहारच्या निवडणुकीनंतर ही नववी सार्वजनिक निवडणूक आहे. लवकर महापालिका निवडणुका व्हाव्यात अशी जनतेची इच्छा होती. मिरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये भाजपा महायुतीची सत्ता येईल. शिवाय इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसेल. नकली शिवसेना गेली, आता खरी शिवसेना आमच्याबरोबर आहे. हिंदुत्व आणि विकास हा आमचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मजबूत आहे. उत्तर प्रदेशात बाबा का बुलडोझर चालतो तसा देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा बुलडोझर महाराष्ट्रात सुरु आहे. जो कुणी विकासाच्या आड येईल त्यांना उद्ध्वस्त करु", असं विधान कृपाशंकर सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच यावर अनेक राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया पडत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number