‘शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजपाचं लक्ष’ – देवेंद्र फडणवीस

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवली आहे. यावर आता, विरोधक मविआवर टीका करत आहेत. एमआयएमच्या हातमिळवणीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपाला हरवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेचा कौल भाजपाला आहे. भाजपासोबत कोण असणार कोण नाही, […]

‘शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजपाचं लक्ष’ – देवेंद्र फडणवीस

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवली आहे. यावर आता, विरोधक मविआवर टीका करत आहेत. एमआयएमच्या हातमिळवणीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपाला हरवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेचा कौल भाजपाला आहे. भाजपासोबत कोण असणार कोण नाही, याचा आम्हाला फरक पडत नाही. तसेच आता एमआयएमने महाविकास आघाडी सरकारला युतीची ऑफर केली आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणती भूमिका घेणार आहे ये पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचे समोर आले आहे. तसेच हा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवावा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. तसेच भाजपाला हरवायचे असेल तर एकत्र येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number