भाजपाची पहिली यादी जाहीर, ९९ उमेदवारांची नावं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपाची पहिली यादी जाहीर, ९९ उमेदवारांची नावं

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  नागपूर दक्षिण-पश्चिममधून तर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने पहिल्या यादीतून मुंबईतील १४ उमेदवार जाहीर केले आहेत. 

भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण भाजपाच्या तिकिटावर नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गणेश नाईक यांना नवी मुंबईतील ऐरोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण गणपत गायकवाड यांच्या पत्नीला सुलभा गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. 

विदर्भातील ६२ पैकी २३ जागांसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर झाले. कामठीचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून त्याठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. याआधी २०१९ मध्ये बावनकुळेंना उमेदवारी नाकारण्यात आली होती. हा एक बदल वगळता विदर्भात विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूरमधून भाजपाने बच्चू कडूंविरोधात प्रविण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रविण तायडे हे याआधी अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य होते. गोंदियात विनोद अग्रवाल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. याआधी २०१९ मध्ये विनोद अग्रवाल यांना उमेदवारी नाकारुन काँग्रेसमधून आलेल्या गोपालदास अग्रवाल यांना संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे नाराज झालेल्या विनोद अग्रवाल यांनी बंड करुन गोपालदास अग्रवाल यांचा निवडणुकीत पराभव केला होता. गोपालदास अग्रवाल यांनी महिन्याभरापूर्वीच काँग्रेसमध्ये घरवापसी केली तर भाजपाने गोपालदास अग्रवाल यांचे २०१९ मध्ये केलेले निलंबन रद्द करुन त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. 

1) नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेंद्र फडणवीस

2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे

3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी

4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत

5) धुळे शहर – अनुप अग्रवाल

6) सिंदखेडा – जयकुमार रावल

7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा

8) रावेर – अमोल जावळे

9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे

10) जळगांव शहर – सुरेश भोळे

11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण

12) जामनेर – गिरीश महाजन

13) चिखली – श्वेता महाले

14) खामगांव – आकाश फुंडकर

15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे

16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर

17) धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद

18) अचलपूर – प्रवीण तायडे

19) देवळी – राजेश बकाने

20) हिंगणघाट – समीर कुणावार

21) वर्धा – डॉ. पंकज भोयर

22) हिंगणा – समीर मेघे

23) नागपूर-दक्षिण – मोहन मते

24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे

25) तिरोडा – विजय रहांगडाले

26) गोंदिया – विनोद अग्रवाल

27) आमगाव (अजजा) – संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे

29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

30) चिमूर – बंटी भांगडिया

31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32) राळेगांव – अशोक उइके

33) यवतमाळ – मदन येरावार

34) किनवट – भीमराव केराम

35) भोकर – श्रीजया चव्हाण

36) नायगांव – राजेश पवार

37) मुखेड – तुषार राठोड

38) हिंगोली – तानाजी मुटकुळे

39) जिंतूर – मेघना बोर्डीकर

40) परतूर – बबनराव लोणीकर

41) बदनापूर (अजा) – नारायण कुचे

42) भोकरदन – संतोष दानवे

43) फुलंब्री – अनुराधा चव्हाण

44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

45) गंगापूर – प्रशांत बंब

46) बागलान (अजजा) – दिलीप बोरसे

47) चांदवड – डॉ. राहुल आहेर

48) नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले

49) नाशिक पश्चिम – सीमा हिरे

50) नालासोपारा – राजन नाईक

51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

52) मुरबाड – किसन कथोरे

53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

54) डोंबिवली – रवींद्र चव्हाण

55) ठाणे – संजय केळकर

56) ऐरोली – गणेश नाईक

57) बेलापूर – मंदा म्हात्रे

58) दहिसर – मनिषा चौधरी

59) मुलुंड – मिहिर कोटेचा

60) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61) चारकोप – योगेश सागर

62) मलाड पश्चिम – विनोद शेलार

63) गोरेगाव – विद्या ठाकूर

64) अंधेरी पश्चिम – अमित साटम

65) विले पार्ले – पराग अळवणी

66) घाटकोपर पश्चिम – राम कदम

67) वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार

68) सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन

69) वडाळा – कालिदास कोळंबकर

70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

71) कोलाबा – अ‍ॅड. राहुल नार्वेकर

72) पनवेल – प्रशांत ठाकूर

73) उरण – महेश बाल्दी

74) दौंड – अ‍ॅड. राहुल कुल

75) चिंचवड – शंकर जगताप

76) भोसरी – महेश लांगडे

77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

78) कोथरूड – चंद्रकांत पाटील

79) पर्वती – माधुरी मिसाळ

80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

81) शेवगांव – मोनिका राजळे

82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले

83) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

84) कर्जत जामखेड – राम शिंदे

85) केज (अजा) – नमिता मुंदडा

86) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा – अभिमन्यू पवार

88) तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

92) माण – जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण – अतुल भोसले

94) सातारा – शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली – नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

97) इचलकरंजी – राहुल आवाडे

98) मिरज – सुरेश खाडे

99) सांगली – सुधीर गाडगीळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number