विधानसभेसाठी भाजपाची तयारी 

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपाने तयारी सुरू केली आहे.

विधानसभेसाठी भाजपाची तयारी 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपाने तयारी सुरू केली आहे. राज्यात २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान पार पडले होते. यामुळे २०२४ मध्येही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात राज्यात निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ही शक्यता गृहित धरुन भाजपाने तयारी सुरू केली आहे. भाजपाचे नेते गुरुवारपासून राज्याच्या वेगवेगळ्या विभागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे. पहिल्या टप्प्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे दोन्ही नेते उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. रविंद्र चव्हाण ठाणे जिल्हा तसेच कोकण विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेतील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number