Nashik Municipal Corporation Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असून नाशिक महापालिकेचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. राज्यातील २९ महापालिकांपैकी नाशिक महापालिकेवर भाजपने मोठ्या फरकाने वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता आपल्या हाती घेतली आहे. नाशिकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार, यावर राजकीय गणिते ठरलेली होती. भाजपने या निवडणुकीत आक्रमक रणनीती आखत प्रचार केला आणि त्याचे स्पष्ट प्रतिबिंब निकालांमध्ये दिसून आले.
भाजपचं ‘मिशन नाशिक’ यशस्वी
नाशिक महापालिकेतील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. वरिष्ठ मंत्री गिरीष महाजन यांच्यावर विजयाची मोठी जबाबदारी होती. भाजपने संघटनात्मक ताकद, स्थानिक प्रश्न, विकासाचा अजेंडा आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोच साधली. परिणामी भाजपने अनेक प्रभागांमध्ये क्लीन स्वीप केला.
शिंदे गट, अजित पवार गट, उबाठा शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी काही ठिकाणी लढत दिली असली, तरी बहुसंख्य प्रभागांमध्ये भाजपने बाजी मारली. काही प्रभागांमध्ये शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली आहे.
प्रत्येक प्रभागातील विजयी उमेदवार (A-B-C-D)
प्रभाग क्रमांक 1
रुपाली नन्नावरे (भाजपा)
रंजना भानसी (भाजपा)
दीपाली गीते (भाजपा)
प्रवीण जाधव (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 2
ऐश्वर्या लाड (भाजपा)
इंदुबाई खेताडे (भाजपा)
रिद्धीश निमसे (भाजपा)
नामदेव शिंदे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 3
प्रियंका माने (भाजपा)
जुही शिंदे (भाजपा)
मच्छिंद्र सानप (भाजपा)
गौरव गोवर्धने (भाजपा)
प्रभाग क्रमांक 4
मोनिका हिरे (भाजपा)
सरिता सोनवणे (भाजपा)
सागर लामखेडे (भाजपा)
हेमंत शेट्टी (भाजपा)
प्रभाग क्रमांक 5
कमलेश बोडके (शिंदे गट)
चंद्रकला धुमाळ (भाजपा)
नीलम पाटील (भाजपा)
गुरमीत बग्गा (भाजपा)
प्रभाग क्रमांक 6
चित्रा तांदळे (भाजपा)
बाळू काकड (भाजपा)
रोहिणी पिंगळे (भाजपा)
प्रमोद पालवे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 7
सुरेश पाटील (भाजपा)
हिमगौरी आहेर-आडके (भाजपा)
स्वाती भामरे (भाजपा)
अजय बोरस्ते (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 8
कविता लोखंडे (भाजपा)
उषा बेंडकोळी (भाजपा)
अंकिता शिंदे (भाजपा)
विलास शिंदे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 9
भारती धिवरे (भाजपा)
दिनकर पाटील (भाजपा)
संगीता घोटेकर (भाजपा)
अमोल पाटील (भाजपा)
प्रभाग क्रमांक 10
विश्वाग नागरे (भाजपा)
इंदुबाई नागरे (शिंदे गट)
माधुरी बोलकर (भाजपा)
समाधान देवरे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 11
सविता काळे (भाजपा)
मानसी शेवरे (भाजपा)
सोनाली भंदुरे (भाजपा)
नितीन निगळ (भाजपा)
प्रभाग क्रमांक 12
राजेंद्र आहेर (भाजपा)
सीमा ठाकरे (अजित पवार)
हेमलता पाटील (अजित पवार)
समीर कांबळे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 13
अदिती पांडे (भाजपा)
मयुरी पवार (मनसे)
राहुल शेलार (भाजपा)
शाहू खैरे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 14
जागृती गांगुर्डे (अजित पवार)
नाझिया अत्तार (काँग्रेस)
समिया खान (काँग्रेस)
सुफी जिन (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 15
प्रथमेश गीते (उबाठा)
सीमा पवार (उबाठा)
सचिन मराठे (भाजपा)
—
प्रभाग क्रमांक 16
राहुल दिवे (शिंदे गट)
आशा तडवी (शिंदे गट)
पूजा नवले (शिंदे गट)
ज्योती जोंधळे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 17
प्रशांत दिवे (भाजपा)
मंगला आढाव (उबाठा)
प्रमिला मैंद (उबाठा)
शैलेश ढगे (उबाठा)
प्रभाग क्रमांक 18
शरद मोरे (भाजपा)
रंजना बोराडे (शिंदे गट)
सुनिता भोजने (शिंदे गट)
विशाल संगमनेरे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 19
रुचिता साळवे (उबाठा)
योगेश भोर (उबाठा)
भारती ताजनपुरे (उबाठा)
—
प्रभाग क्रमांक 20
सतीश निकम (शिंदे गट)
सीमा ताजने (भाजपा)
जयश्री गायकवाड (भाजपा)
कैलास मुदलियार (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 21
कोमल मेहरोलिया (भाजपा)
रमेश धोंगडे (शिंदे गट)
श्वेता भंडारी (भाजपा)
जयंत जाचक (भाजपा)
प्रभाग क्रमांक 22
वैशाली दाणी (उबाठा)
योगेश गाडेकर (उबाठा)
संजीवनी हंडोरे (उबाठा)
केशव पोरजे (उबाठा)
प्रभाग क्रमांक 23
रुपाली निकुळे (भाजपा)
मंगला नन्नावरे (भाजपा)
संध्या कुलकर्णी (भाजपा)
चंद्रकांत खोडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 24
पल्लवी गणोरे (भाजपा)
प्रवीण तदमे (शिंदे गट)
पूनम महाले (शिंदे गट)
राजेंद्र महाले (भाजपा)
प्रभाग क्रमांक 25
सुधारकर बडगुजर (भाजपा)
साधना मटाले (भाजपा)
कविता नाईक (शिंदे गट)
मुरलीधर भामरे (उबाठा)
प्रभाग क्रमांक 26
निवृत्ती इंगोले (शिंदे गट)
हर्षदा गायकर (शिंदे गट)
नयना जाधव (शिंदे गट)
भागवत आरोटे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 27
प्रियंका दोंदे (भाजपा)
किरण राजवाडे (अजित पवार)
किरण गामणे (शिंदे गट)
नितीन दातीर (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 28
दीपक दातीर (शिंदे गट)
प्रतिभा पवार (भाजपा)
सुवर्णा मटाले (शिंदे गट)
शरद फडोळ (भाजपा)
प्रभाग क्रमांक 29
मुकेश शहाणे (अपक्ष)
छाया देवांग (भाजपा)
योगिता हिरे (भाजपा)
भूषण राणे (भाजपा)
प्रभाग क्रमांक 30
श्याम बडोदे (भाजपा)
सुप्रिया खोडे (भाजपा)
डॉ. दिपाली कुलकर्णी (भाजपा)
अजिंक्य साने (भाजपा)
प्रभाग क्रमांक 31
भगवान दोंदे (भाजपा)
माधुरी धिमसे (उबाठा)
वैशाली दळवी (उबाठा)
बाळकृष्ण शिरसाठ (भाजपा)