आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजपा देणार प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेच्या कारभारावर जाब विचारण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधताना मुंबई महालिकेच्या कारभारावरून गंभीर आरोप केले होते. तसेच एक जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र आता या मोर्चाला भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले […]

आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजपा देणार प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेच्या कारभारावर जाब विचारण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधताना मुंबई महालिकेच्या कारभारावरून गंभीर आरोप केले होते. तसेच एक जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र आता या मोर्चाला भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला भाजप, शिवसेना, आणि आरपीआय महायुतीकडून ‘चोर मचाये शोर’चा नारा प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महायुतीकडून ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात प्रत्युत्तर मोर्चा काढला जाणार आहे. शनिवारी चार वाजता महायुतीच्या वतीने नरिमन पॉईंट येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने महायुती ठाकरे गटाविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारे कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावाने जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला होता. या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले होते की येत्या १ जुलैला ठाकरे गटाच्या वतीने मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढला जाणार आहे, ज्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचार जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number