‘चिकनच्या रांगेत दिसला तरी भाजपवाले ईडीला कळवतील’ – संजय राऊत

कोल्हापूर पोट निवडणूकीत पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, ‘कोल्हापूरात भाजपाने मतदारांच्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे राज्यात जपून पैसे खर्च करा. भाजीची जुडी विकत घ्यायला गेलात, तरी तुमच्यावर भाजपाचे लक्ष असेल. तुम्ही चिकनच्या […]

‘चिकनच्या रांगेत दिसला तरी भाजपवाले ईडीला कळवतील’ – संजय राऊत

कोल्हापूर पोट निवडणूकीत पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘कोल्हापूरात भाजपाने मतदारांच्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे राज्यात जपून पैसे खर्च करा. भाजीची जुडी विकत घ्यायला गेलात, तरी तुमच्यावर भाजपाचे लक्ष असेल. तुम्ही चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं, यावर भाजपचे लक्ष असेल. तसेच भाजपवाले ईडीला कळवतील. त्यामुळे नागरिकांनी सावध राहा’, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे.

तसेच ते म्हणाले, देशात भाजपशासित राज्यात मोठ्या प्रमाणात भोंगे आहेत. गोव्यात दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. तर उत्तर प्रदेशातील भोंगेही तसेच आहेत. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन होणे गरजेचे असल्याचे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी वापरलेली भाषा फक्त त्यांनाच शोभून दिसते, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number