भाजपाला अतिआत्मविश्वास नडला

भाजपाला अतिआत्मविश्वास नडला आहे. भाजपाचा नागपुरात पराभव झाला असून अमरावतीत कुंथत कुंथत वाटचाल सुरु आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका लागल्यापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. नागपुरात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार पराभूत झाले त्याचबरोबर दुसरीकडे अमरावतीत रणजित पाटील […]

भाजपाला अतिआत्मविश्वास नडला

भाजपाला अतिआत्मविश्वास नडला आहे. भाजपाचा नागपुरात पराभव झाला असून अमरावतीत कुंथत कुंथत वाटचाल सुरु आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका लागल्यापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती.
नागपुरात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार पराभूत झाले त्याचबरोबर दुसरीकडे अमरावतीत रणजित पाटील हे सध्या पिछाडीवर आहेत. मागील दोन टर्म नागो गाणार हे आमदार होते त्यामुळे तेच हॅटट्रिक करतील असा अतिआत्मविश्वास भाजपात होता. पण, नागपुरात नागो गाणार यांना पराभूत करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे. अमरावतीतही रणजित पाटील यांना मागे टाकत धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत.
सोमवारी ३० जानेवारी रोजी राज्यातील पाच मतदार संघाच्या निवडणूकांसाठी मतदान पार पडले. गुरुवारी २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु असून एकामागोमाग एक निवडणुकांचा निकाल लागत आहे. आतापर्यंत, पाच पैकी तीन मतदारसंघाचा निकाल लागला आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number