Mumbai BJP-MNS : "नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल" भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केला आहे.

Mumbai BJP-MNS : &quotनाशिक आणि कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल&quot भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे. तसेच निवडणूक निकालानंतर आठवड्याभराच्या आतच मनसेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. अशातच आता मुंबईसाठी भाजपसोबत युत करणार असल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे. मुंबई महापालिकेतही उबाठा गट एकटाच राहिल. तसेच नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केला आहे.

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी; शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

यावेळी नवनाथ बन म्हणाले की, “राज ठाकरे एकटे लढले तेव्हा अधिक नगरसेवक निवडून आलेत. नाशिकमध्ये मनसे पाठिंबा देतोय. येत्या काळात मुंबईत आणि इतर ठिकाणी अशाच गोष्टी तुम्हाला होताना दिसतील. राज ठाकरेंना माहिती आहे विकास कोण करु शकते, हिंदुत्ववाद पुढे कोण नेऊ शकतं हे राज ठाकरेंना माहिती आहे. हिरवा अजेंडा उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परस्पर विरोधी आहे. फक्त खुर्ची मिळवायची यासाठी राज ठाकरेंना सोबत घेतले होते. विकासकामांना प्राध्यान्य देण्याचे काम राज ठाकरे करत असतात”, भाजप प्रवक्ते नगरसेवक नवनाथ बन यांच्या या विधानानंतर आता महापौर निवडीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number