ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीआधीच भाजपाचं खातं उघडलं! कोकणात इतके उमेदवार बिनविरोध विजयी…

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच भाजपनं खातं उघडलं; सिंधुदुर्गसह कणकवलीतही महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीआधीच भाजपाचं खातं उघडलं! कोकणात इतके उमेदवार बिनविरोध विजयी…

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याबाबतची माहिती गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. ही निवडणूक रायगड, रत्नगिरी, सिधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी व लातूर या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. दरम्यान, निवडणुकांपुर्वीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

हेही वाचा- भाजपला 24 तासांत दुसरा धक्का, शिवसेनेकडे आला हुकूमी एक्का, नेमकं काय सुरू आहे राजकारणात?
पंचायत समिती निवडणुकीआधीच भाजपनं खातं उघडलं असून सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये कोकीसरे मतदारसंघातून भाजपच्या साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड झाली. त्याचसोबत कणकवली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुकीतील भाजपा महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील वैभववाडी पंचायत समितीमधील कोकिसरे मतदारसंघातील उमेदवार साधना नकाशे आणि कणकवली पंचायत समितीमधील बिडवाडी मतदारसंघातील संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number