भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना कोरोनाची लागण

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. नुकताच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राधाकृष्ण विखे-पाटील हेसुद्धा उपस्थित होते. […]

भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना कोरोनाची लागण

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.

नुकताच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राधाकृष्ण विखे-पाटील हेसुद्धा उपस्थित होते. तर विखे-पाटील यांनी शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. या लग्न सोहळ्यात राधाकृष्ण विखे-पाटील विनामास्क वावरतानाचे दृश्य समोर आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ट्विट केले की, ‘आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझीटिव्ह आली असल्याने मी स्वत: विलीगीकरणात जात  आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी.’

हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे यांना कोरोना

तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनासुद्धा कोरनाची लागण झालेली आहे. २८ डिसेंबर रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या  कन्येचा विवाह होता. या विवाह सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळेही आल्या होत्या. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number