Thane Municipal Corporation Mayor : ‘महायुती म्हणून एकत्र लढलोय…प्रमुख पदांसाठी नक्कीच शिवसेनेसोबत चर्चा करून मार्ग काढू’; महापौरपदाबाबत भाजप नेत्याचं वक्तव्य

नवी मुंबई : भाजपनं आज, मंगळवारी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जाऊन ठाणे महापालिकेच्या २८ नगरसेवकांची गट नोंदणी केली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर तसेच आमदार निरंजर डावखरे हे उपस्थित होते. भाजपने गटनेतेपदी मुकेश मोकाशी या ज्येष्ठ नगरसेवकाची निवड केली असून त्यांनी ठाण्यात महापौरपदासाठीदेखील दावा केला आहे. मुकेश मोकाशी हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले […]

Thane Municipal Corporation Mayor : ‘महायुती म्हणून एकत्र लढलोय…प्रमुख पदांसाठी नक्कीच शिवसेनेसोबत चर्चा करून मार्ग काढू’; महापौरपदाबाबत भाजप नेत्याचं वक्तव्य

नवी मुंबई : भाजपनं आज, मंगळवारी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जाऊन ठाणे महापालिकेच्या २८ नगरसेवकांची गट नोंदणी केली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर तसेच आमदार निरंजर डावखरे हे उपस्थित होते. भाजपने गटनेतेपदी मुकेश मोकाशी या ज्येष्ठ नगरसेवकाची निवड केली असून त्यांनी ठाण्यात महापौरपदासाठीदेखील दावा केला आहे. मुकेश मोकाशी हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. तसेच ते ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौरदेखील आहेत. दरम्यान, आमदार निरंजन डावखरे यांनी पुन्हा एकदा महापौरपदासाठी दावा केला आहे. महायुती अजूनही कायम असून अडीच वर्षाचं महापौरपद मिळावं, अशी अपेक्षा असे संकेत त्यांनी दिले आहे. महापालिकेत विरोधात बसण्याइतपत आमचं संख्याबळ आहे. मात्र ठाणे महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत. त्यामुळे या पदावर कोणीही बसला तरी त्यांचा कार्यकाळ हा 2 ते अडीच वर्षांचा असावा, याबाबत शिवसेनेसोबत चर्चा करू, असे निरंजन डावखरे यांनी नमूद केले. 

हेही वाचा : Girish Mahajan On Farmers Protest : लाल वादळ मुंबईच्या दिशेने; शिष्टमंडळाशी चर्चा काय? गिरीश महाजन म्हणाले…

ठाणे महापालिकेतील पक्षिय बलाबल 

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने 71 जागांवर स्पष्ट विजय मिळवला असून 4 जागांवर आघाडी कायम असल्याने हा आकडा 75 पर्यंत पोहोचला आहे. तर भाजपने 28 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 9 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12 जागांवर विजयी झाली आहे. तसेच एमआयएमने 5 जागा जिंकून सर्वांना चकित केले असले तरी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस आणि मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी अनुसूचित जातीकरता ही जागा आरक्षित झाली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number