भाजप नेत्याचे राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊतयांनी आज माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला. ‘केंद्रातील मोदी सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. त्यावर […]

भाजप नेत्याचे राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊतयांनी आज माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला. ‘केंद्रातील मोदी सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. त्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. मोदी आणि शहा नसते तर ठाकरेंनी मुंबई विकली असती, असे प्रत्युत्तर राणेंनी दिले.

राऊत यांनी नीती आयोगाबाबत टीका केली. तसेच, मुंबई महाराष्ट्र राज्यापासून तोडणार अशी जुनी टेपरेकॉर्डर पुन्हा सुरू आहे. मोदी व शहा नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती. मुंबईला कोण गिळत होत तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मुंबई वाचवण्याचे काम मोदी- शहा आणि फडणवीस केले आहे, असे नितेश राणे म्हणाले.

यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. सुनील राऊत म्हणाले की, आपल्याला आजही विरोधकांकडून १०० कोटीची ऑफर आहे. मात्र १०० कोटी कसले, सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही. राऊत बंधू खोटारडे आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हाच सुनील राऊत अमित शहांच्या कार्यालयाबाहेर व भाजप कार्यालयाबाहेर चार-चार तास थांबून होता.आम्ही भाजपात प्रवेश करतो, पण माझ्या भावाला सोडा, अस सांगत होता, एकेरी उल्लेख करत राणेंनी राऊतांनी डिवचले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number