भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावास

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना तीन महिन्यांच्या कारावासासह २० हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय आहे प्रकरण? वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना बोंडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. ही घटना २०१७मध्ये घडली होती. त्यामुळे शिवीगाळ आणि […]

भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावास

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना तीन महिन्यांच्या कारावासासह २० हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?

वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना बोंडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. ही घटना २०१७मध्ये घडली होती. त्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा वरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याप्रकरणी आज निकाल लागला असून डॉ. अनिल बोंडे यांना शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलं.

मारहाणी केल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना वरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अनिल बोंडे यांच्याविरोधात कलम ३५३, ३३२, ५०४ आणि ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून त्यांना साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number