Dharashiv Tuljapur : आरोपींसाठी भाजपची दारं उघडी! ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार

राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयाने आता तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

Dharashiv Tuljapur : आरोपींसाठी भाजपची दारं उघडी! ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार

राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना भाजपमध्ये मात्र आरोपींसाठी दारं उघडी केली जात आहेत. गडचिंचले साधू हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता. मात्र विरोधकांच्या आणि राज्यभरातून केल्या जाणाऱ्या टीकेनंतर तो पक्षप्रवेश आता भाजपने रद्द केला आहे. असं असताना दुसरीकडे राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

एका आरोपीचा पक्षप्रवेश थांबवून भाजपने दुसऱ्या आरोपीला थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. यामुळे तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणेचा काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि तेथील काही स्थानिक नेत्यांनी पिटू गंगणे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या या निर्णयाने आता तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

कोण आहे पिटू गंगणे? 
एप्रिल 2025 मध्ये पोलिसांनी तुळजापुरातील तामलवाडी येथून एमडी ड्रग्सचा मोठा साठा बाहेर काढला होता. पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली होती, त्यातलाच एक होता पिटू गंगणे. त्यानंतर आता तो ड्रग्स प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आहेत. एवढचं नव्हे तर या प्रकरणी तुळजापूर मंदिरातील 13 पुजारींचा ड्रग्स तस्करीत सहभाग असल्याचे देखल समोर आले होता.

विरोधी पक्षांनी यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होता. 
दरम्यान भाजप पक्षश्रेष्ठींकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज यांना उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र  आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत पिटू गंगणेलाच उमेदवारी दिली. भाजपच्या या निर्णयामुळे तुळजापूरमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. 

काशिनाथ चौधरी प्रकरण काय ? 
2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तब्बल 4000 पेक्षा जास्त समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. या प्रवेशामुळे भाजपवर विरोधकांकडून जोरदार टिका होत असून या राजकीय हालचालीमुळे अनेक प्रश्न पुन्हा एकदा पुढे येऊ लागले आहेत. यामागचं कारण असं की, 16 एप्रिल 2020 रोजी डहाणूतील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडवली होती.

हत्याकांडानंतर जवळपास 200 जणांना अटक करण्यात आली होती, तर काही आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर सशर्त जामीन मिळाला आहे. त्या काळात भाजपने या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार धारेवर धरले होते. याच भडकलेल्या वातावरणात काशिनाथ चौधरी यांचे नाव मुख्य आरोपींपैकी एक म्हणून समोर आले होते. तेव्हा भाजपनेच त्यांच्यावर हत्याकांडात थेट सहभागाचे आरोप केले होते. मात्र आता तोच चेहरा भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत आणि नैतिकतेबाबत अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. स्थानिक
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number