BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपची कोअर कमिटी जाहीर

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक समिती स्थापन करत तयारीला वेग दिला आहे.

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपची कोअर कमिटी जाहीर

मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्षांतर्गत महत्त्वाचा निर्णय घेत महानगरपालिका निवडणूक समितीची स्थापना केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी आणि निवडणूक रणनीती प्रभावीपणे राबवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: Local Body Election: राज्यातील 23 नगर परिषदा व नगर पंचायतींसाठी आज मतदान; 143 जागांसाठी लढत

या निवडणूक समितीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, आशीष शेलार, राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांचा या समितीत समावेश आहे.

या समितीकडे पक्ष संघटन बळकट करणे, निवडणुकीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेणे, उमेदवार निवड आणि प्रचाराची दिशा ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून आता अधिक आक्रमक आणि नियोजनबद्ध तयारी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

महापालिका निवडणुका जवळ येत असताना भाजपची ही हालचाल आगामी राजकीय संघर्षाची नांदी ठरणार असल्याचे मानले जात असून, मुंबईसह राज्यातील शहरी राजकारणात पुढील काही दिवसांत मोठी घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Kolhapur Election: कोल्हापुरात सत्ता कोणाची? महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा एकजुटीचा निर्धार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number