मुंबई : गृहमंत्री अमित शाह बुधवारी संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बैठक झाली. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असून भाजपा १४५ ते १५० जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी एकूण १२५ ते १३० जागा देण्यास भाजपा तयार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपा सतर्क झाली असून डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांवर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची रणनीती देखील आखण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.