Uddhav Thackeray Birthday Wish : फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; काही वेळातच पोस्ट डिलिट, एका पोस्टने अनेक तर्कवितर्क

शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या होता.

Uddhav Thackeray Birthday Wish : फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; काही वेळातच पोस्ट डिलिट, एका पोस्टने अनेक तर्कवितर्क

शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या होता. तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या होत्या. असं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त धक्का बसला आहे. 

शिवसेनेतील नुकतेच फुटलेल्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या दोन खासदारांनी राजकीय मतभेद असले तरी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याच्या या कृतीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र संजय जाधव यांनी काही वेळात उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देणारी पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा- Jaykumar Gore : ‘कर्जमाफीबाबत सरकार मोठा निर्णय घेणार…’; जयकुमार गोरे यांनी सांगितलं महायुती सरकारचं प्लानिंग

इतकचं नव्हे तर संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, संजय जाधव यांच्या या बॅनरची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दुपारनंतर ‘आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा,’ अशी फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने तेही चर्चेत आहेत. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त दुपारनंतर फेसबुक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमुळे दोनही नेते चर्चेत आले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number