Bihar Chief Minister : आज बिहारला मिळणार नवीन मुख्यमंत्री, भाजपकडून कोणाची नावं चर्चेत?; जाणून घ्या सविस्तर माहिती

पाटणा : बिहारमध्ये आज, मंगळवारी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार असल्याने भाजपचे सम्राट चौधरी आणि जेडीयूचे निशांत कुमार यांच्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक झाल्यानंतर आज पाटणा येथे पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर राजीनामा दिला असून शपथविधी सोहळा […]

Bihar Chief Minister : आज बिहारला मिळणार नवीन मुख्यमंत्री, भाजपकडून कोणाची नावं चर्चेत?; जाणून घ्या सविस्तर माहिती

पाटणा : बिहारमध्ये आज, मंगळवारी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार असल्याने भाजपचे सम्राट चौधरी आणि जेडीयूचे निशांत कुमार यांच्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक झाल्यानंतर आज पाटणा येथे पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर राजीनामा दिला असून शपथविधी सोहळा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. जवळपास अनेक दशके मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर नितीश पायउतार होतील. दरम्यान, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी सांगितले की, पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी मंगळवारी दुपारी 3 वाजता पक्षाच्या कार्यालयात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक होईल, जिथे विधिमंडळ पक्षाचा नेता निश्चित केला जाईल.

हेही वाचा : Ashok Kharat Case: कोट्यवधी गोठवले, गाडीही केली जप्त; भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

तसेच मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नितीश गांधी राजीनामा देऊ शकतात. असे झाल्यास, बिहारला 15 एप्रिलपर्यंत नवीन मुख्यमंत्री मिळू शकतात. दोन दशके बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सेवा बजावल्यानंतर नितीश कुमार दिल्लीला रवाना झाले. त्यांनी 11 एप्रिल रोजी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांनी यापूर्वी 30 मार्च 2026 रोजी बिहार विधानसभेतील विधान परिषद सदस्य (एमएलसी) पदाचा राजीनामा दिला होता. नितीश 16 मार्च रोजी राज्यसभेवर निवडून आले होते आणि नियमानुसार, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या सदस्याला 14 दिवसांच्या आत विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा देणे आवश्यक असते.

भाजपने अद्याप आपल्या पसंतीच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तथापि, सम्राट चौधरी हे आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. तर नित्यानंद राय आणि रेणू देवी यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. 243 सदस्यीय बिहार विधानसभेत 36 मंत्र्यांपर्यंतचे मंत्रिमंडळ असू शकते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number