Bihar Elections: बिहारमध्ये मतदानाचा उत्साह; "जंगलराज परत येऊ देऊ नका" म्हणत अमित शाह यांची तरुणांना विशेष हाक

या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा निकाल बिहारच्या आगामी राजकीय समीकरणांवर निर्णायक ठरणार आहे.

Bihar Elections: बिहारमध्ये मतदानाचा उत्साह; &quotजंगलराज परत येऊ देऊ नका&quot म्हणत अमित शाह यांची तरुणांना विशेष हाक

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यातील मतदानात राज्यातील 121 विधानसभा मतदारसंघांतील 3.75 कोटींपेक्षा जास्त मतदार एकूण 1314 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बिहारच्या जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण असून सकाळपासूनच मतदार केंद्रांवर रांगा दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी ‘एक्स’ वरून बिहारच्या जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी लिहिले, “बिहारच्या मतदार बांधवांनो, विशेषतः तरुणांनो, पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान करा. तुमचं प्रत्येक मत बिहारमध्ये ‘जंगलराज’ परत येण्यापासून रोखेल, सुशासन टिकवेल आणि विकसित, आत्मनिर्भर बिहारच्या निर्मितीचा मार्ग मोकळा करेल.” शाह पुढे म्हणाले, “देशाची सुरक्षा बिघडवणाऱ्यांना, घुसखोरांना आणि नक्षलवाद्यांना संरक्षण देणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा. प्रत्येक मतदाराचे मत आधुनिक शिक्षण, गरीब कल्याण, आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यासह बिहारच्या गौरवाच्या पुनर्स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”

हेही वाचा: Uber Metro Ticket Booking: मेट्रो प्रवासासाठी रांगेचा त्रास संपला; डिजिटल मेट्रो तिकीटिंगसाठी उबरची मुंबईमध्ये नवी सुविधा

या पहिल्या टप्प्यात बिहारमधील 14 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, मंगल पांडे, नितीन नवीन, जीवेश मिश्रा, संजय सरावगी, सुनील कुमार, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, मदन सहनी आणि महेश्वर हजारी या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय, राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे भविष्यदेखील या टप्प्यात ठरणार आहे. या टप्प्यात अनेक चर्चित चेहरेही राजकीय मैदानात उतरले आहेत. यात लोकगायिका मैथिली ठाकुर, भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव, माजी आयपीएस आनंद मिश्रा, तसेच सीवानचे बाहुबली माजी खासदार शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसाम शहाब हेही उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल, मात्र सुरुवातीपासूनच मतदानासाठी मतदारांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रचार केला असून, या टप्प्यातील निकालावर बिहारच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे.

हेही वाचा: No Shave November Reason : सोशल मीडियावर 'नो शेव्ह नोव्हेंबर'चा ट्रेंड, जाणून घ्या इतिहास आणि कारण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number