Bihar Assembly Elections 2025 : ‘टायगर अभी जिंदा है!’; नितीश कुमार समर्थकांची बॅनरबाजी

पटना येथे नितीश कुमार यांना “टायगर अजून जिवंत आहे” असे संबोधणारे पोस्टर चर्चेत आले असून मतमोजणीदरम्यान सुरक्षा वाढवण्यात आली आहे. NDA 53 आणि महागठबंधन 29 ठिकाणी आघाडीवर आहेत.

Bihar Assembly Elections 2025 : ‘टायगर अभी जिंदा है!’; नितीश कुमार समर्थकांची बॅनरबाजी

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांच्या प्रतिक्षेत असताना पटना येथील मुख्यमंत्री निवासस्थान 1 अने मार्गासमोर एक खास पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जनता दल यूनायटेडच्या (JD(U)) कार्यकर्त्यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना “वाघ अजून जीवंत आहे” असे संबोधत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. या पोस्टरमध्ये सर्व धार्मिक समुदायांचे आभारही मानले असून नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हावेत, अशी पक्षकार्यकर्त्यांची इच्छा स्पष्ट दिसते. पटना शहरात दुसरे एक पोस्टरही लागले असून त्यात नितीश कुमार यांना समाजाच्या सर्व घटकांचे “रक्षक” म्हणून दाखवले आहे. विशेषतः समाजाच्या उपेक्षित घटकांना संरक्षण देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होताच पोलिस दलांची तैनाती वाढवण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission of India, ECI) 16 नोव्हेंबर पर्यंत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पटना जिल्हाधिकारी यांनी Section 163 of BNSS 2023 नुसार बंदी आदेश जारी केले असून विजय जलूसावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्राथमिक रुझानांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 53 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 29 जागांवर पुढे आहे. जनसुराज पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे.

सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झाली आणि EVM मोजणी 8 वाजून 30 मिनिटांपासून सुरू झाली. निकालांच्या दिशेने बिहार हळूहळू पुढे सरकत आहे. मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातील 243 मतदारसंघांसाठी 4372 काउंटिंग टेबल्स आणि 18000 पेक्षा जास्त काउंटिंग एजंट तैनात आहेत. बहुतेक Exit Polls एनडीएच्या विजयाचा अंदाज वर्तवतात, तर काही सर्वेक्षणांमध्ये महागठबंधनला चांगली टक्कर मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या प्रेस नोटनुसार, या निवडणुकीत एकूण 2616 उमेदवार आणि 12 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष सहभागी झाले होते. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले आणि कोणत्याही मतदारसंघात पुनर्मतदानाची मागणी करण्यात आलेली नाही. मुख्य लढत JD(U)-BJP आघाडी, RJD काँग्रेस महागठबंधन आणि नवागत जनसुराज पक्षामध्ये होत आहे. निकालांचा वेग वाढत असताना बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार, यावर राज्याचे आणि देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

हेही वाचा: Bihar Assembely Elections 2025 : सुरुवातीच्या मतमोजणीत NDAची आघाडी; ”या’ जागांसाठी ‘काटे की टक्कर!’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number