Bihar Cabinet Expansion: बिहारमध्ये आज सत्तेचा ‘महाविस्तार’; सम्राट चौधरी सरकारमधील 27 आमदार घेणार शपथ; पाहा भाजपच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा आज पाटणा येथील गांधी मैदानावर भव्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

Bihar Cabinet Expansion: बिहारमध्ये आज सत्तेचा ‘महाविस्तार’; सम्राट चौधरी सरकारमधील 27 आमदार घेणार शपथ; पाहा भाजपच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

बिहारच्या राजकारणातील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा आज पहिला मोठा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर दुपारी 12 वाजता हा भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण बिहारचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची उपस्थिती

या मंत्रिमंडळ विस्ताराचे वैशिष्ट्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार आहे. गांधी मैदानावर मंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून नेत्यांच्या आगमनासाठी खास हेलिपॅड देखील उभारण्यात आले आहे.

भाजप कोठ्यातील 'या' 10 चेहऱ्यांवर शिक्कामोर्तब

शपथविधी सोहळ्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कोठ्यातून मंत्री होणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये अनुभवी नेत्यांसह तरुण चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपच्या यादीत प्रामुख्याने ई. शैलेंद्र, संजय टायगर, विजय सिन्हा, नितीश मिश्रा, श्रेयसी सिंह, दिलीप जयस्वाल, अरुण शंकर प्रसाद, प्रमोद चंद्रवंशी, लखेंद्र पासवान आणि मिथिलेश तिवारी यांच्या नावांचा समावेश आहे. या नावांच्या निवडीतून भाजपने जातीय आणि प्रादेशिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

हेही वाचा:SRH Vs PBK IPL 2026: कूपर कोनोलीचं झुंजार शतक व्यर्थ! सनरायझर्स हैदराबादने पंजाबचा विजयरथ रोखला

27 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

आजच्या या विस्तारामध्ये एनडीएचे एकूण 27 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बिहार मंत्रिमंडळात एकूण 36 जागांची मर्यादा असून, उर्वरित जागा भरण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अनेक जुन्या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे, तर काही ठिकाणी फेरबदल करण्यात आले आहेत. सम्राट चौधरी यांनी नुकताच दिल्ली दौरा करून पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली होती, त्यानंतरच या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.

नव्या टीमकडून बिहारच्या विकासाची अपेक्षा

या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सम्राट चौधरी सरकार आता पूर्ण क्षमतेने कामाला लागणार आहे. बिहारमधील प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणांना गती देण्यासाठी ही नवी टीम सज्ज झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणारा हा शपथविधी सोहळा बिहारमधील एनडीएच्या शक्तीप्रदर्शनाचा एक भाग मानला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मंत्रिमंडळाची ही नवी रचना करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: कुठे उन्हाच्या झळा, तर कुठे पावसाच्या सरी; मुंबई-ठाण्याला 'हीटवेव्ह'चा अलर्ट; तर विदर्भ-मराठवाड्यात…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number