Big Boss Marathi 6: दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार’; बिग बॉस मराठीच्या घरात हे 17 स्पर्धक दाखल

यंदाच्या सीझनमध्ये राजकारण, अभिनय, कॉमेडी आणि सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रातील 17 वादळी व्यक्तिमत्त्वांनी घरात पाऊल ठेवलं आहे.

Big Boss Marathi 6: दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार’; बिग बॉस मराठीच्या घरात हे 17 स्पर्धक दाखल

मुंबई: 11 जानेवारी 2026 च्या सायंकाळी अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा पडदा उघडला. सुपरस्टार रितेश देशमुखच्या दमदार स्टाईलने आणि “दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार” या आगळ्यावेगळ्या थीमने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. यंदा घराची रचना ‘800 खिडक्या आणि 900 दारं’ अशी असून, स्पर्धकांना एन्ट्री घेतानाच नशिबाच्या दोन दारांपैकी एकाची निवड करायची होती, एक ‘मेहनतीचा मार्ग’ आणि दुसरा ‘शॉर्टकट’!

यंदाच्या सीझनमध्ये राजकारण, अभिनय, कॉमेडी आणि सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रातील 17 वादळी व्यक्तिमत्त्वांनी घरात पाऊल ठेवलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि बॉलिवूड स्टार राकेश बापट यांच्या एन्ट्रीने घराचा माहोल अधिकच रंगतदार झाला आहे. तर ‘कातिलों की कातिल’ म्हणून ओळखली जाणारी नृत्यांगना राधा पाटील हिने आपल्या अदांनी प्रीमियरमध्येच आग लावली.

हेही वाचा: IND Vs NZ Cricket: किवींचे काहीच चालेना; टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सलग आठवा विजय, शुबमन ब्रिगेडचा धुव्वा

स्पर्धकांसाठी खरा पेच होता तो प्रवेशद्वाराचा! दिपाली सय्यद, सोनाली राऊत, तन्वी कोलते, करण सोनावणे, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार या सहा स्पर्धकांनी ‘शॉर्टकट’चं दार निवडलं आहे. याउलट सागर कारंडे, सचिन कुमावत, अनुश्री माने, राकेश बापट, राधा पाटील, ओमकार राऊत आणि विशाल कोटीयन यांसारख्या खेळाडूंनी ‘मेहनतीचा मार्ग’ स्वीकारत आपली नियत स्पष्ट केली आहे.

बिग बॉस मराठी सीझन 6 मधील स्पर्धकांची यादी : 

1. दिपाली सय्यद 2. तन्वी कोलते 3. सचिन कुमावत 4. सोनाली राऊत 5. सागर कारंडे 6. आयुष संजीव 7. करण सोनावणे 8. प्रभु शेळके उर्फ डॉन 9. प्राजक्ता शुक्रे 10. रुचिता जामदार 11. अनुश्री माने 12. राकेश बापट 13. रोशन भजनकर 14. दिव्या शिंदे 15. राधा पाटील 16. ओमकार राऊत 17. विशाल कोटीयन

राडा तर होणारच!

17 स्पर्धक, 100 हून अधिक कॅमेरे आणि रितेश भाऊंची चाबूक नजर, यामुळे हे पर्व मागील सर्व विक्रम मोडणार असं दिसतंय. पहिल्याच दिवशी शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांना घराबाहेरच्या बागेत किंवा वेगळ्या परिस्थितीत राहावं लागणार का? की हे दार त्यांना काही विशेष अधिकार देणार? हे पाहणं रंजक ठरेल. आता या 17 जणांचा नशिबाचा खेळ सुरू झाला आहे. महाराष्ट्राचा लाडका ‘भाऊ’ आता कोणाला शाबासकी देणार आणि कोणाचे कान टोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं तुफान भाषण! शिट्ट्या अन् टाळ्यांच्या उत्साहात शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांमध्ये नवा जोश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number