Ajit Pawar Plane Crash : विमानाला आग, दादांच्या दोन्ही गुडघ्यातून धूर…; बारामतीच्या सरपंचांनी सांगितला अपघाताआधीचा थरार

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता नवं वळण समोर आलं आहे. आता बारामतीतील सरपंच प्रत्यक्षदर्शीने अजित पवारांच्या अपघाताची नवीन माहिती समोर आणली आहे.

Ajit Pawar Plane Crash : विमानाला आग, दादांच्या दोन्ही गुडघ्यातून धूर…; बारामतीच्या सरपंचांनी सांगितला अपघाताआधीचा थरार

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता नवं वळण समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मिटकरींच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी अपघाताच्या दिवशीचा घटनाक्रम उलगडत एक धक्कादायक माहिती समोर आणली. अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळण्याच्या क्षणी त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही माहिती ऐकून घटनास्थळी असलेले ग्रामस्थही स्तब्ध झाले होते, असे मिटकरी यांनी सांगितले. त्यानंतर आता बारामतीतील सरपंच प्रत्यक्षदर्शीने अजित पवारांच्या अपघाताची नवीन माहिती समोर आणली आहे. यावेळी विमानातून कोण बाहेर नव्हत तसेच विमानात पाच जण होते अशा अनेक गोष्टींचा खुलासा या व्यक्तीने केला आहे.

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash: बारामती दुर्घटनेत नवा ट्विस्ट, दादांचं विमान कोसळण्याआधी एक जण उडी मारत होता पण…; प्रत्यक्षदर्शीची मिटकरींना माहिती

यावेळी हे सरपंच प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, “विमान पडल्यानंतर मला उजव्या बाजूला असं जानवलं की, निळी पॅन्ट परिधान गेलेला एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता असं मला काही काळासाठी वाटल. त्यानंतर आमच्याच गावचा एक रहिवासी मला जोरात आवाज देत म्हणाला सरपंच मागे व्हा स्फोट होईल. त्याच ऐकून मी मागे झालो आणि त्या विमानाचा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर विमानाचे काही पार्ट 100 ते 150 फुटांपर्यंत लांब फेकले गेले. अमोल मिटकरी साहेबांना जे वाटलं तो वेगळा विषय आहे, पण मी तिथे प्रत्यक्षदर्शी होतो मी पाहिलं की, विमानाचा दरवाजा थोडा उघडा होता आणि एक निळी पॅन्ट घातलेला माणूस पाहायला मिळाला. कोण बाहेर उडी नव्हत मारत पण मला तसं जाणवलं… पण नंतर मी मागे झालो आणि तोपर्यंत होत्याच नव्हत झालं. अमोल मिटकरी साहेबांच आणि माझ काहीच बोलण झालेलं नाही. मी डाव्या बाजूला गेल्यानंतर अजित पवार 25-30 फुटांवर पडलेले होते. त्याचवेळेस बारामतीचे किरण गुजर पण तिथे आले होते. ते मोठ्याने रडायला लागले आणि त्यांनी मला हे सांगितलं की हे विमान अजित पवारांच आहे. हे जे पडले आहेत ते अजितदादा आहेत. त्यावेळेस विमानात एकून पाच व्यक्ती होते” 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number