Maharashtra Monsoon Session 2026: मोठी बातमी, पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित; अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये होणार जोरदार चर्चा

अर्थसंकल्‌पीय अधिवेशनानंतर आता पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तारीख विधिमंडळ सचिवालयाकडून निश्चित करण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Session 2026: मोठी बातमी, पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित; अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये होणार जोरदार चर्चा

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली. अनुक्रमे आधी विधानसभा आणि मग विधान परिषदेच्या कामकाजाबाबत स्वतंत्र बैठका होणार असून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती-उपसभापती आणि विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहतील. या बैठकीत विधिमंडळ कामकाजाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. तसेच अर्थसंकल्‌पीय अधिवेशनानंतर आता पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तारीख विधिमंडळ सचिवालयाकडून निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा- Tukaram Mundhe Raid on Cosmetic Products: महिलांच्या ड्रेसिंग टेबलपर्यंत पोहोचली FDA ची नजर! तुकाराम मुंडेंच्या कारवाईत समोर आलं धक्कादायक वास्तव

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सोमवार 22 जूनपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. विधानसभेचे कामकाज सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल. तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी 12 वाजतापासून सुरू होईल. राज्याचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेने विधिमंडळ सचिवांकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती बघता हे अधिवेशनही वादळी ठरणार असल्याचे संकेत आहे. यात अनेक मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेण्याचा प्रयत्न होईल. यावर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचे काही मुद्दे उचलून धरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number