कलिंगडाच्या दरात मोठी घसरण

दरवर्षी कलिंगडला १२ ते १५ रुपयांचा दर मिळतो यावर्षी मात्र, कलिंगडाला प्रति किलोसाठी ३ ते ५ रुपयांचा दर मिळत आहे. तळकोकणात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दर पडल्याने सिंधुदुर्गात शेकडो टन माल शेतात पडून आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेलं कलिंगड यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. दर नसल्यामुळे […]

कलिंगडाच्या दरात मोठी घसरण

दरवर्षी कलिंगडला १२ ते १५ रुपयांचा दर मिळतो यावर्षी मात्र, कलिंगडाला प्रति किलोसाठी ३ ते ५ रुपयांचा दर मिळत आहे. तळकोकणात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दर पडल्याने सिंधुदुर्गात शेकडो टन माल शेतात पडून आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेलं कलिंगड यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे.

दर नसल्यामुळे बाजारात कलिंगड नेऊन काय करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड शेतातच पडून आहे. याचा मोठा आर्थिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे उत्पादन घेतलं जातं. गोव्यात कलिंगडाची मोठी बाजारपेठ आहेत. मात्र, कर्नाटकमधून गोवा बाजारपेठेत कलिंगडाची मोठी आवक झाली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number