एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाची मागणी संपकारी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावी असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले आहे. अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना निराशा केले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.
राज्यात एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मात्र विलिनीकरणाची मागणी डोक्यातून काढून टाका, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारने पूर्ण फुली मारणे चुकीचे असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत.
संपकारी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाचा प्रश्न चर्चा करूनही सोडवता आला असता, मात्र थेट विलिनीकरण शक्य नाही हे जाहीर करणे अयोग्य असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. तसेच पेट्रोल, डिझेल भाव कमी करण्यासाठी सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत आहे. तसेच राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मगाणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई उपलब्ध देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच एसटीचे विलिनीकरण का शक्य नाही, हे उपमुख्यत्र्यांनी कर्मचाऱ्यांना समजून सांगावे असे आवाहन त्यांनी केले आहे.