सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक खरात प्रकरणावरून खळबळ माजली आहे. महिलांना फसवून त्यांच्याबरोबर अश्लिल चाळे करतानाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. सध्या खरात पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
याचे पडसाद आज विधी मंडळात उमटले आहेत. खरातबद्दल आज भास्कर जाधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भोंदूबाबावर सरकार निर्णय घेत आहे. पण या प्रकरणात सरकारचा थेट संबंध आला आहे. या प्रकरणात सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत.
आपल्या महाराष्ट्राची ओळख अभिमानाने सांगतो. पण असे भोंदू येऊन सगळं खराब करतात. तुम्हीदेखील त्यामध्ये सहभागी होता. त्या बाबाचं मुत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाहीत तुम्हाला? या पुरोगामी राज्यात असं करायला लाजा वाटत नाहीत का? छत्रपतींच्या राज्यात असं काही होत असेल तर ते तातडीने थांबलं पाहिजे. तसेच सरकारने यावर कडक कारवाई करावी.