उन्हाळा म्हंटलं कि सर्वांनाच चटक लागते ती म्हणजे आंबे खाण्याची. पण बऱ्याच वेळा आंबे खाऊन झाल्यावर आपण त्याची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. मात्र आंब्याच्या सालीचेदेखील खूप फायदे आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हणजेआंब्याच्या सालीत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आंब्याची साल चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळ होते आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. याशिवाय,आंब्याच्या सालीमधे आर्द्रता असल्याने ती त्वचेला मॉश्चरायझकरायचे देखील काम करू शकते. चला पाहूया आंब्याच्या सालीचे फायदे-
अँटी एजिंग : आंब्याच्या सालीत अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत होते. तसेच कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या दूर होतात.
अँटी अॅक्नी : आंब्याच्या सालीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मुरुमांशी संबंधित जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
एक्सफोलिएटिंग : आंब्याच्या सालीत असलेल्या एन्झाईम्समुले त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा नितळ आणि मऊ बनविण्यात मदत होते.
डिस्क्लेमर – वरील माहिती घरघुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारलेली आहे. उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या.