महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजपमध्ये थेट लढत

बेळगावात सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.अत्यंत चुरशीने यासाठी मतदान होत असून मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप मध्ये थेट लढत होत आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नीना उमेदवारी दिली आहे तर एकीकरण समितीने नवखा शुभम शेळके नावाचा उमेदवार दिला आहे.शुभमने या निवडणुकीत चांगलेच आव्हान […]

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजपमध्ये थेट लढत

बेळगावात सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.अत्यंत चुरशीने यासाठी मतदान होत असून मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप मध्ये थेट लढत होत आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नीना उमेदवारी दिली आहे तर एकीकरण समितीने नवखा शुभम शेळके नावाचा उमेदवार दिला आहे.शुभमने या निवडणुकीत चांगलेच आव्हान निर्माण केले आहे.महाराष्ट्रातील नेते संजय राऊत, देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात जाऊन प्रचार सभा घेत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.कर्नाटकातून अर्धे मंत्रिमंडळ भाजपच्या प्रचारार्थ उतरले होते.त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number