Beed: लग्न ठरलं…मांडव सजला…अन् नवरदेवाने अचानक दिला नकार; पीएसआयचं संतापजनक कृत्य

पवन निंबाळकर नावाच्या पीएसआयने लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

Beed: लग्न ठरलं…मांडव सजला…अन् नवरदेवाने अचानक दिला नकार; पीएसआयचं संतापजनक कृत्य

बीड तालुक्यातील एका गावातून   धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पीएसआयवरच फसवणुकीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन निंबाळकर नावाच्या पीएसआयने लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच अचानक नवरदेवाने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांनी आयुष्यभराची कमाई, दागिने, कपडे, साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर खर्च केली. मात्र शेवटी त्यांच्या पदरी आली ती फक्त फसवणूक आणि बदनामी. 

विशेष म्हणजे, या घटनेनंतर आई-वडिलांनी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्याच्या गावी गेले असता तुमची जर लग्न करायची इच्छा असेल तर 20 तोळे सोनं दहा लाख रुपये हुंडा मला आत्ता द्या अशी मागणी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली. मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला असून या घटनेचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number