शिवसेनेतून कुंडलिक खाडेंची हकालपट्टी

पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करून महायुतीची मते फिरणाऱ्या कुंडलिक खाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.

शिवसेनेतून कुंडलिक खाडेंची हकालपट्टी

बीड : पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करून महायुतीची मते फिरणाऱ्या कुंडलिक खाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये एक पुरुषी आवाज ऐकू येत आहे. बोलणाऱ्याने स्वतःबाबत जे काही सांगितले त्यावरून आवाज कुंडलिक खाडे यांचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. क्लिपमध्ये फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत आहे. बोलणारी व्यक्ती पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याची जाहीर कबुली देत असल्याचे ऐकू येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेतून कुंडलिक खाडेंची हकालपट्टी करण्यात आली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number