बीड पालकमंत्रीपदाचा मुद्दा गाजणार

फडणवीस सरकारमध्ये खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण यावरून स्थानिक पातळीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

बीड पालकमंत्रीपदाचा मुद्दा गाजणार

बीड : फडणवीस सरकारमध्ये खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण यावरून स्थानिक पातळीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यातच राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यात मुंडे बहीण भावांपैकी पालकमंत्री कोण यावरून आता पारावर आणि कट्ट्यावर चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पालकमंत्री आपल्यालाच मिळणार अशी इच्छा आहे.

बीडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा सध्या गाजत आहे. बहीण भावात छुपी चढाओढ पाहायला मिळत आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पालकमंत्रीपदासाठी चढाओढ आहे.

 

पालकमंत्री कोण होणार ?

पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. आधी दोघांनीही पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून पाच वर्षे जबाबदारी पार पाडली आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री म्हणून साडेचार वर्षे जबाबदारी होती. फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा यांच्याबाबत नाराजीचा सूर होता. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्धात वरिष्ठांना मध्यस्थी करावी लागली होती. आता धनंजय मुंडे यांचे नाव बीड हत्याकांडाच्या सुत्रधाराशी जोडले जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी दोन्ही नेत्यांची आग्रही भूमिका असली तरी ते दोन्ही मंत्री एकाच जिल्ह्याचे असल्याने पालकमंत्रीपद भाजपा स्वतःकडे ठेवतंय की ते राष्ट्रवादीला मिळणार यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस काय घेतात याची उत्सुकता बीडच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे.

हेही वाचा : ठाकरे बंधू एकत्र कारण काय?

पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री असताना बीड जिल्ह्याचा विकास केला आहे. त्यांच्या काळात बरीच विकास काम झालेली आहेत. शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. मुंडेसारखंच 18 पगड जातींना घेऊन चालणाऱ्या आहेत. सगळ्या जातींना घेऊन त्या काम करतात. त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांनाच मिळायला हवं असे बीडमधील ग्रामस्थांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे यांनी देखील विकास केल्याचे म्हटले आहे. पण जातींचा मुद्दा उपस्थित करत पंकजा मुंडेंना पालकमंत्रीपद मिळाले असे ग्रामस्थांना वाटत आहे.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number