मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेना आणि उद्धव गटात जोरदार हाणामारी झाली आहे. शिंदे गटाकडून उद्धव गटाच्या महिलेला मारहाण करण्यात आली. उद्धव गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांकडू मारहाण करण्यात आली. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
रोशनी शिंदे या उद्धव गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. कामावरून घरी जाताना कार्यालयाच्या बाहेर रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. फेसबुक पोस्टवरून रोहिनी यांना मारहाण करण्यात आली. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला आहे. संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली असून पीडीत महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पीडित महिला गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. रोशनी शिंदे सायंकाली ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात येऊन त्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवसेनेच्या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव गटाच्या महिलांकडून कासारवडवली पोलीस स्थानकात केली आहे. तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्यामुळे उद्धव गटाच्या कार्यकर्यांनी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या माडंला. यावेळी खासदार राजन विचारे, केदार दिघे हे उपस्थित होते. तर, रोशनी शिंदे गर्भवती असल्याचा दावा उद्धव गटाकडून करण्यात आला आहे.
‘काल ठाण्यातील रॅली कव्हर करणाऱ्या पत्रकाराला एक प्रवक्ताने धमकी दिली आणि दुसऱ्याने बाहेर न निघण्यास सांगितले. दिघे साहेब असते तर त्यांनी काय केलं असतं ते सर्वांना माहिती आहे. नुसतं आनंद मठ नावावर करून काही होत नसतं.’