प्रजासत्ताक सोहळ्याची राजपथावर शानदार सांगता झाली. तर दरवर्षी २९ जानेवारी रोजी ‘बीटिंग द रिट्रीट’ या सोहळ्यान सांगता होते. आज नवी दिल्लीमध्ये ऐतिहासिक विजय चौकात आज ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सशस्त्र दलाच्या सैन्यांच्या संगीताच्या धूनवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच ड्रोन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला.
‘बीटिंग द रिट्रीट’ ही जुनी लष्करी परंपरा आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून स्वातंत्र्य भारताच्या स्मरणार्थ ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा एक भाग आहे.
पाहा हा व्हिडिओ :