Bargi Dam Accident: क्रूझ दुर्घटनेत स्थानिक ‘देवदूत’ धावले; वादळी लाटांना झुंज देऊन वाचवले 14 जीव; प्रशासनाकडून मोठी मदत जाहीर

अनेक जण बेपत्ता असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. खराब हवामानामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

Bargi Dam Accident: क्रूझ दुर्घटनेत स्थानिक ‘देवदूत’ धावले; वादळी लाटांना झुंज देऊन वाचवले 14 जीव; प्रशासनाकडून मोठी मदत जाहीर

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे नर्मदा नदीवरील बरगी धरणात घडलेली क्रूज दुर्घटना आता मोठ्या शोकांतिकेत परिवर्तित झाली आहे. गुरुवारी (30 एप्रिल 2026) सायंकाळी आलेल्या भीषण वादळामुळे पर्यटकांनी भरलेला क्रूज असंतुलित होऊन पाण्यात बुडाली. शुक्रवारी (1 मे 2026) सकाळी बचावकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.

ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 22 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप 6 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोहीम हाती घेतली आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने तज्ज्ञ पथके बोलावून अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली आहे.

बुडालेले क्रूज बाहेर काढण्यासाठी मोठ्या हायड्रॉलिक यंत्रणा आणि जेसीबीचा वापर केला जात आहे. बचाव पथकाने गॅस कटरच्या मदतीने क्रूजचे काही भाग कापून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. क्रूजच्या आतही मृतदेह अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळपासून एका महिलेसह दोन मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा वाढला आहे.

हेही वाचा: GT Vs RCB IPL 2026: आरसीबीची दमदार फलंदाजी व्यर्थ, कोहली-पडिक्कलची झुंज अपयशी; गुजरातने थांबवला बंगळुरचा विजयी रथ

या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या लोकांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने चिंता अधिक वाढली आहे. पाच वर्षांचा तमिल, सहा वर्षांचा विराज सोनी, सात वर्षांची पूनम थापा आणि नऊ वर्षांचा मयूरम यांचा शोध सुरू आहे. याशिवाय 39 वर्षीय कामराज, 66 वर्षीय रेशमा सय्यद आणि 34 वर्षीय ज्योती श्रीवास यांचाही अद्याप पत्ता लागलेला नाही. प्रशासन त्यांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवून शोधकार्य सुरू ठेवत आहे.

घटनास्थळी राज्य सरकारचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, पर्यटन मंत्री धर्मेंद्र लोधी, स्थानिक खासदार आशीष दुबे आणि आमदार नीरज सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक इलैयाराजा टी देखील उपस्थित असून संपूर्ण ऑपरेशनचे निरीक्षण करत आहेत.

या क्रूजची क्षमता सुमारे 60 लोकांची होती. अपघाताच्या वेळी त्यात 2 कर्मचारी आणि 29 पर्यटक होते. 2006 पासून हे क्रूज बरगी धरणात कार्यरत होती. 200 ते 220 रुपयांदरम्यान तिकिटदर असलेल्या या सेवेत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश होता.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी काही स्थानिक कामगारांनी धाडस दाखवत अनेकांचे जीव वाचवले. जोरदार वादळामुळे उंच लाटा निर्माण झाल्या होत्या, तरीही त्यांनी जीव धोक्यात घालून 12 ते 14 जणांना वाचवले. त्यांच्या या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वांचे लक्ष आता सुरू असलेल्या बचावकार्याकडे लागले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सततचा पाऊस आणि धरणामधील पाणी यामुळे बचावकार्याला अडथळे येत असले तरी प्रशासन पूर्ण क्षमतेने शोधमोहीम राबवत आहे. 

हेही वाचा: Maharashtra Din Hostory: मोरारजी देसाईंचा 'तो' आदेश अन् 106 जणांची प्राणांची आहुती; महाराष्ट्र दिनानिमित्त वाचायलाच हवी अशी संघर्षाची गाथा

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number